नविन गाडी घेणाऱ्या दिव्यांग बांधवासाठी विशेष सवलत GST/RTO/insurance/free Toll
नविन
गाडी घेणाऱ्या दिव्यांग बांधवासाठी विशेष सवलत GST/RTO/insurance/free Toll
बऱ्याच अपंग बांधवांना या गोष्टीची माहिती नसेल केंद्र सरकारने अपंग बांधवांना नवीन कार घेणेसाठी मोटर वाहन कायदा 2019 पासून Ministry of Heavy
Industries मार्फत जी.एस.टी मध्ये सवलत दिली आहे व रोड टॅक्स हा संपूर्णतः माफ आहे त्या साठी आधी तुम्ही गाडी कोणती घेणार ते निश्चित करावं लागेल.कोणतीही गाडी घ्या कोणत्याही कंपनी ची गाडी घ्या तिची लांबी 4000mm पेक्षा जास्त नको पेट्रोल, व सी एन जी वाहन हे 1200 cc पर्यंत च चालेल व डिझेल वाहन हे 1500 cc पर्यंत चालेल. या साठी ऑन लाईन अर्ज https://dhigecs.
heavyindustry. gov.in या वेब साईट वरून करावा लागतो.आधी या वेब साईटवरून रजिस्ट्रेशन करून घ्यावे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो उदा.MHI-0810210*****-1*** हा मला मिळाला होता.त्या नंतर तुमचे नाव,वडिलांचे नाव,मोबाईल नंबर,ई मेल आय डी, जन्मतारीख,पुरुष का स्त्री, शरीरावरील एखादी खूण, पॅन नंबर,आधार कार्ड नंबर,UDID कार्ड नंबर,तुमचं राज्य,जिल्हा,पिनकोड, तुमचा पत्ता एवढी वैयक्तिक माहिती भरावी लागते त्या नंतर गाडी बद्दल माहिती कोणती कंपनी,कोणतं मॉडेल,पेट्रोल की,डिझेल,किती cc, गाडी ची लांबी किती,त्या नंतर कंपनी ची माहिती कंपनी कुठं आहे,त्यांचा ई मेल आय डी,कंपनी चा मोबाईल नंबर,राज्य,जिल्हा,पिनकोड,कंपनी चा पत्ता, त्या नंतर,RTO ची माहिती गाडी कुठं रजिस्टर करणार आहात त्यांच ऑफिस कुठं आहे त्यांचा ई मेल आय डी, त्यांचा फोन नंबर,राज्य,जिल्हा,पिनकोड,ऑफिस चा पत्ता,त्या नंतर पुन्हा वैयक्तिक माहिती गाडी ज्यांना घ्यायची आहे त्यांचा फोटो 2 mb मध्ये असावा.सही 50 kb मध्ये असावी.नाव,कशाच अपंगत्व आहे ते अपंगत्वाची टक्केवारी, कायम च अपंगत्व आहे का ? कोणत्या डॉक्टर ने परीक्षण केले आहे त्या डॉक्टर चे नाव त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर सिव्हिल सर्जन चे नाव त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर,अपंग सर्टिफिकेट, नंतर अंडरटेकिंग, व सर्वात शेवटी सेल्फ डिक्लेरेशन जोडावे एवढी सर्व माहिती भरून अपलोड करावी ही सर्व माहिती केंद्र सरकार च्या अवजड उद्योग मंत्रालयामार्फत व्हेरिफिकेशन होते काहीच त्रुटी नसेल तर 4 आठवड्या च्या आत तुम्हाला GST कनसेशन सर्टीफिकेट तुमच्या ई मेल वर येते.व काही त्रुटी आढळली तर ती पण ई मेल वर च कळवण्यात येते.या साठी या साईट वर अर्ज अपलोड केल्यापासून दर दोन चार दिवसात ई मेल आय डी चेक करत राहणे GST सर्टिफिकेट आल्यावर आपण गाडी घेणार त्या डीलर ला दाखवून गाडी घेणे या साठी आधी गाडी बुक करणे गरजेचे आहे कारण या सर्टीफिकेट ची मुदत फक्त 3 महिने असते.3 महिन्यानंतर हे सर्टिफिकेट निष्क्रिय होते गाडी घेतल्यानंतर सिव्हिल सर्जन कडून ड्रॉयव्हिंग फिटनेस सर्टिफिकेट घेऊन गाडी RTO ला दाखवून RTO सिव्हिल सर्जन च्या फिटनेस सर्टिफिकेट नुसार BTI फॉर्म भरून देतो.म्हणजे गाडीत अपंगांना गाडी चालवता यावी यासाठी कुठले बदल करावे हे सुचवलेले असते त्या नुसार गाडी मध्ये तसे बदल नाशिक किंवा मुंबई ला करून देतात त्या नंतर गाडी RTO ला दाखवून डिस्क्लेमर काढून पासिंग करून घ्यावी डिस्क्लेमर काळजीपूर्वक पहावा त्यात गाडीची सर्व माहिती असते व टॅक्स माफ असतो फक्त 50 रु रजिस्ट्रेशन फी 200 रु स्मार्ट कार्ड फी व 50 रु पोस्टेज असे 300 रु भरावे लागतात या व्यतिरिक्त काहीही भराव लागत नाही व आर सी बुक आल्यानंतर फास्ट टॅग साठी ही ऑन लाईन अर्ज करावा लागतो.झिरो बॅलन्स चा फास्ट टॅग मिळतो व ऑल इंडिया टोलमाफ मिळतो.अश्या प्रकारे अपंग बांधवांसाठी ही केंद्र सरकारची योजना आहे.
रमेश राठोड (9049437284)
अध्यक्ष प्रहार दिव्यांग
सरकारी निमसरकारी कर्मचारी अधिकारी संघटना सातारा

