अपंग मोफत बस पास योजना (DWS)

ramson
1 minute read
0

 

  दिव्यांग मोफत बस पास योजना (DWS)

पुणे शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना पीएमपीएमएल बसेसचे मोफत वार्षिक पासेस दिले जातात. या पासेसची रक्कम पुणे महानगरपालिकेकडून पीएमपीएमलला दिली जाते.

मोफत बस पास योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • कुटुंबाचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान वर्षे वास्तव्य असल्याचा दाखला (रेशनिंग कार्डची साक्षांकित प्रत आवश्यक) तसेच वर्षे वास्तव्य असलेल्या राहण्याचा पुरावा म्हणून गत वर्षाचा मनपा टॅक्स पावती किंवा लाईट बिल किंवा टेलिफोन बिल (लॅण्डलाईन) किंवा झोपडी फोटो पास / झोपडी सेवा शुल्क पावती / भाडे करारनामा . जोडावे.
  • सर्व वयोगटातील अपंग (नि:समर्थ) व्यक्ति (वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला / ससून जनरल हॉस्पिटलमधील वयाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मतदान यादीतील नाव अथवा मतदान ओळखपत्र यापैकी एक आवश्यक)
  • दिनांक ०१/०५/२००१ नंतर जन्माला आलेल्या हयात अपत्यांमुळे कुटुंबाच्या अपत्यांची संख्या दोनपेक्षा जास्त झाल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • मा. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारी नुसार ४०% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व (नि:समर्थ) असल्याचा दाखला तसेच शासन वेळोवेळी जे बदल सुचवतील त्या प्रमाणात नियम अटीत बदल करण्यात येईल.
  • अर्जदाराच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करावी.
  • पुणे महानगरपालिका अपंग स्मार्ट कार्ड असल्यास झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक.
  • अटी नियम यांत बदल करण्याचा / अर्ज नाकारण्याचा अधिकार मा.महापालिका आयुक्त अथवा ते प्राधिकृत करतील त्या अधिकाऱ्यास राहील.
  • स्कॅन डॉक्युमेंट्स संलग्न करणे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करताना मूळ कागदपत्र (original documents) सोबत आणावेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!